भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ

dev dhanve magen na kari alas | sanditan bhavapash mayajal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ ॥१॥ सर्वभावें जें कां शरण रिघती । तयांचें वोझें श्रीपती अंगें वाहे ॥२॥ नको भुक्तिमुक्ति सदा नामीं हेत । देव तो अंकित होय त्यांचा ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा ज्यांचा भाव । तया घरीं देव पाणी वाहे ॥४॥