भजनी मालिका

भजने

त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ।। तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ।।

रचनाकार: संत रामदास

त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥ सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नाम-देवा ॥१॥ रुसलासे नामा देवासी न बोले । करें कुर्वाळिलें वदन तेव्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥ न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥ जीवें भावें सर्वस्वें घेतलें धरणें । म्यां काय करणें ऐशियासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं ॥१॥ श्वान काय जाणे मेरूचें प्रमाण । कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

थोडे तुम्ही मागें होते उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥ आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥१॥ भोगविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥ व्यर्थ भरावरी केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम