भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोडे तुम्ही मागें होते उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव

thode tumhi magen hote uddharile | maj aise gele vanyan jiv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थोडे तुम्ही मागें होते उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥ आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥ तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥ तुका म्हणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥