भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें

thor anyay kela tujha ant myan pahila | janachiya bolasatin chitta kshobhavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥१॥ भोगविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तहानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥