भजनी मालिका
← भजनांकडे परत

थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी

thadiyesi nighatan pashananchya sangadi | budatan madhyabhagin tethen kon ghali udi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥ न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥ सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥ तुकाम्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥