भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय

tvampad tatpad asipad yanvegala dise | khol bunthi gheuni vitevari ubha ase ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥ भक्तां अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥ पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥