भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें

thoden pari niren | avit ten ghyaven kharen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥ घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥ चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥ आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥