भजनी मालिका

भजने

दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखीं नाहीं दुजा ॥१॥ भावें दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥ अग्नी काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामें जोडे सर्व सिद्धि । धन्य जगीं नाम तें ॥१॥ उच्चारितां घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिकां अत्यर्क्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दंभें कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥ अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥ तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दया हेचि दाता मन करी उदार । सर्व हा श्रीधर ऐसें भावी ॥१॥ तुटेल यातना होईल वैकुंठ । पंढरी मूळपेठ सेवी कांरे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें ॥१॥ प्रसन्न होऊनी दीनातें पहातो । आवडी उद्धरीतो भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दर्दुराचें पिलूं ह्मणे रामकृष्ण । नाहीं उदक उष्ण झालें तेथें ॥१॥ कढईमध्यें बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दर्शन याचें आदरें घेतां। ओपी सायुज्यता मुक्तीतें ॥१॥ न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदानी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दर्शना धांवोनियां जे येती । तयां मुक्ति वोळंगती ॥१॥ ऐसे जोडूनि ठेविलें । युगायगीं उभें केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा