भजनी मालिका
← भजनांकडे परत

दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना

dambhen garven maden gheralense bhari | anusralon kesari panchanana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥ तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥ त्रिविद्या तूं पारु दोहींचा वृत्तांतु । सत्त्व राहे तीतूं जयालागीं ॥३॥ निर्गुण निराकार केशव उदार । नामा म्हणे पार उतरतील ॥४॥