भजनी मालिका
← भजनांकडे परत

दया हेचि दाता मन करी उदार । सर्व हा श्रीधर ऐसें भावी

daya hechi data man kari udar | sarva ha shridhar aisen bhavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दया हेचि दाता मन करी उदार । सर्व हा श्रीधर ऐसें भावी ॥१॥ तुटेल यातना होईल वैकुंठ । पंढरी मूळपेठ सेवी कांरे ॥२॥ इच्छिती अमर नित्य काळ नेमें । दाटताति प्रेमें सनकादिक ॥३॥ तें हें विठठलनाम पवित्र चोखडें । अंतरीं माजिवडे नित्य करी ॥४॥ होतील कामारि ऋद्धिसिद्धी अपार । आपण श्रीधर कुरवाळील ॥५॥ नामा म्हणे येथें न लगेची मोल । विठठल निमोल सर्वांभूतीं ॥६॥