भजनी मालिका
← भजनांकडे परत

थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा

thiten majhen prem gheuni baisala | ajhuni nuthi vahila nama tujha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥ जीवें भावें सर्वस्वें घेतलें धरणें । म्यां काय करणें ऐशियासी ॥२॥ कासया अपराध ठेविशिल मज । शिकवितें तुज नाहीं कोणी ॥३॥ संसारा गांजले जन्ममरणा उबगले । म्हणोनी शरणा आले भयाभीत ॥४॥ कृपा उपजली जीवें अनुसरला । जीव गुंतला माझे ठायीं ॥५॥ दवडितां वेगळे वोसंगा रिघालें बळें । बोलताहे साळे भोळे करुणावाचनीं ॥६॥ तेणें माझें ह्रदय कळवळलें । म्हणोनि देखतां डोळे निवती माझे ॥७॥ शरणा आलिया ते म्यां जरि अव्हेरावें । कोण कोणें आपंगावें सांग सत्य ॥८॥ शत्रुमित्र आदि करूनी सकळ । दुःख अळुमाळ पडों नेदी ॥९॥ संसाराची येणें सांडियेली सोयी । प्राणें माझ्या ठायीं अनुसरला ॥१०॥ आतां याची लटिकी करी दूर आस । नामा म्हणे उदास सर्वस्वासी ॥११॥