भजनी मालिका

भजने

चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥ कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्तार्‍या चितरें काढी भिंतीवरी । तैसें जग सारे अवघे हें ॥ १ ॥ पोरें हो खेळती शेवटीं मोडिती । टाकूनियां जाती आपुल्या घरा ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम