भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया

chitta shuddha tari shatru mitra hoti | vyaghra he na khati sarpa taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥ दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥ आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥