भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें

chitta gvahi tethen laukikachen kai | svahit ten thayin apanapen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥ भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥ तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥