भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई

chitta tujhya payin | thevuni jalon utarai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥ आम्ही सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥२॥ इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥ न पडे विसर । तुझा आम्हां निरंतर ॥४॥ प्रेम एकासाठी । तुका म्हणे न वेचे गांठी ॥५॥