भजनी मालिका

भजने

हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥ घेऊनि हरीश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लागे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी त्वां कोणाचें बरवें केलें । पूर्ण आम्हां कळों आलें ।।१।। नारद वैष्णव जगजेठी। त्यासी लाविली लंगोटी ।।२।।

रचनाकार: संत गोणाई

हरी त्वां कोणाचें बरवें केलेंज । पूर्ण आम्हां कळों आलें ॥१॥ नारदा वैष्णव जगजेठी । त्यासी लाविली लंगोटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरी म्हणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥ हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीकथेवांचून इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथें ॥१॥ जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू ॥१॥ हरिदासांमाजी होसी तूं आगळा । प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरीचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥ पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम