भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी

harichiya bhajanen hariche jan | kariti pavan patitansi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी ॥१॥ ऐसा त्यांचा अगाध महिमा । निरुपमा तो न वर्णवे ॥२॥ देऊनियां परमार्थसिध्दी । पावविती पदीं श्रीहरीच्या ॥३॥ निळा म्हणे सत्संगसुख । गणितां अधिक् परमामृता ॥४॥