भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचें नामचि एक पुरे । सकळ साधनाचिये धुरें

harichen namachi ek pure | sakal sadhanachiye dhuren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीचें नामचि एक पुरे । सकळ साधनाचिये धुरें ॥१॥ पावावया वैकुंठासी । लहानथोरां विश्वासीयांसी ॥२॥ न लगे जाणें वनांतरा । सोडोनियां घरदारा ॥३॥ निळा म्हणे वैकुंठीपद । जावया हे संपदा ॥४॥