भजनी मालिका

भजने

आतां हें शेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥ नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥ भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें । सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥ ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आंतु बाहेरी सर्वांपासीं । परी हा कोणासी नाढळे ॥१॥ मोहियली मायाभ्रमें । संसारसंभ्रमें म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥ वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ