भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें

atinchen arta hoten majhaya manin | bahut divas nayanin prakashalen ten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥ भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें । सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥ आवडीचें निज प्रकाशलें गुज । आतां नाचेन भोज येणें छंदें ॥३॥ निळा म्हणे दिशा व्यापूनियां मही । प्रकाश माझया देहीं संचरला तो ॥४॥