भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा आंगे प्रसिध्द देखिला

atma ange prasidhda dekhila

आत्मा आंगे प्रसिध्द देखिला । अंतर्बाह्य अलिप्त व्यापला ॥१॥ देखिजेसें नाहीं देखिला म्हणती काई । देखणें तें देहीं देखतुसे ॥२॥ रुपरेखा नाहीं लक्षावा कवणें ठायीं । लक्षीं लक्षितांही परतल्या दृष्टी ॥३॥ ज्ञानदेव म्हणें आनंद होईल पूर्ण । अनुभवें तेचि खुण देखतसे ॥४॥