भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे

atan honar ten hovo pandharinatha | na sodi sarvatha charan tujhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥