भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न

atmatvachen thayin sarva ekakar | nahin narinar bhed bhinna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥ वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥ सदोदित पाहे सर्वाठायीं आहे । एकाजनार्दनीं सोय धरी त्याची ॥३॥