भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मरुपीं रुप रंगलें सहज

atmarupin rup rangalen sahaj

आत्मरुपीं रुप रंगलें सहज । रिगोनि निजगुज सतेजीलें ॥१॥ तेज बीज बिवडा पेरिलेंनि वाडें । उगवलें चोखडें ब्रह्मरुप ॥२॥ शांतिची गोफ़ण उडविला प्रपंच । धारणा आहाच स्थिर केली ॥३॥ वेटाळिलें धान्य खळे दान दिठी । दिधलें शेवटीं भोक्तियासी ॥४॥ देते घेते जीवें नुरेचि शेखीं । शिवमेव खोपी समरसीं ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदारा । ऐसा एकसरा तुष्टलासी ॥६॥