भजनी मालिका

भजने

कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥ नेणें रे कैसें वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥ न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥ ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥ अदिकरुनि ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥ कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥ जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥ आहे तें मागतों दिसतें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम