भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला

kaisi karun atan sang tujhi seva | shabdadnyanen deva nash kela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥ संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं म्हणती एक ॥२॥ बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥ न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥ न जावें देउळा म्हणती देवघरीं । बुडविली या परी तुका म्हणे ॥५॥