भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसे झालें देवदर्शन । देवा पाहतां आहे कोण

kaise jhalen devadarshan | deva pahatan ahe kon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैसे झालें देवदर्शन । देवा पाहतां आहे कोण ॥१॥ डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥ पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥ एका जनार्दनीं पाहे । पाहणें पाहतां देवाचि आहे ॥४॥