भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसे बोटानें दाखवूं तुला

kaise botanen dakhavun tula

कैसे बोटानें दाखवूं तुला । पाहे अनुभव गुरुच्या मुला । नको सोडूं देठीच्यां मुळा । सोडी अंजुळी आपुल्या कुलारे ॥१॥ ज्या ठायीं चळना ढळ । विश्व जयाचें सत्तेनें खेळ । अणुरेणु व्यापक सकळ । तेथें चळ ना अचळरे ॥२॥ जेथें डोळिया दृष्टि पुरेना । तेथें वृत्तीचें कांही चालेना । तेथें बुध्दीचा रीघ होईना । तेथें मनाची धांव पुरेना गा ॥३॥ काय पहाशी तूं भोंवतें । येतां जातां जवळी असते ॥ तुझ्या पायाखालीं तुडवतें । तुझ्या डोळ्यामध्यें दिसतें गा ॥४॥ ही खुण त्त्वां ओळखुनी घ्यावी । गुरुपुत्रा जाउनी पुसावी । तो नेऊनी तुला दाखवी । सोय सांगितली ज्ञानदेवी गा ॥५॥