भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसी समचरणीं शोभा । अवघा जगीं विठ्ठल उभा

kaisi samacharanin shobha | avagha jagin viththal ubha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैसी समचरणीं शोभा । अवघा जगीं विठ्ठल उभा ॥१॥ येणें विठ्ठले लाविलें पिसें । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥ पहाते पाहाणीया माझारी । पहाते गेलें पाहाण्यापरी ॥३॥ एका जनार्दनीं एकु । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥