भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी

kaisen karun dhyan kaisa pahon tuj | varma davin maj yachakasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥ कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥ कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥ तुका म्हणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥