भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय तुम्हांपाशीं

kaisen bhalen deva anubhava kan naye | ushir to kay tumhampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥ आहे तें मागतों दिसतें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥ नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥२॥ तुका म्हणे हात आवरीला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥३॥