भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा होतो ब्रम्हानंद । भागयमंद न देखति

kaisa hoto bramhanand | bhagayamand na dekhati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कैसा होतो ब्रम्हानंद । भागयमंद न देखति ॥१॥ वाजतां वादयें नाईके कानीं । वीट मानी अभागी ॥२॥ म्हणे सेवूं या रे गडी । तोडूं बेडी संसार ॥३॥ निळा म्हणे ऐसी वेळ । न लभे काळ वेचलीया ॥४॥