भजनी मालिका

भजने

अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥ प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं ॥१॥ देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥ आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करुनी सांठवण । ते धरिले हृदयी ॥१॥ पुष्ट झाली अंगकांती ।आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनाथांचा नाथ तुझी ब्रीदावली । मज कांरे जाळी भावव्यथा ॥१॥ देव म्हणे नाम्या गुरुवांचुनियां । मुक्ति पावावया आन नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग ॥१॥ ये गा तूं विठ्ठला माझिया माहेरा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥ तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे ॥१॥ अनंत भक्तांचें अनंते धांवणे । वाढविलें तेणें नामासाठीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे ॥१॥ भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशनें पापें जातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥ ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । निवारी दुःखासी केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनाथाचा नाथ, दिनाचा दयाळ म्हणवोनी सांभाळ करी माझा ।।१।। तुजा ऐसा देवा नाही त्रिभुवनी । म्हणवोनी चरणी विनटले ।।२।।

रचनाकार: संत लाडाई

अनाथाची कोण पाववील हांक । तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥ मी एक दुर्बळ येतों काकुलती । नेणाची श्रीपती काय करुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अनाथासी साह्म होसी नारायणा । करुणावचना बोलविसी ॥१॥ पांडुरंगा कृपा करीं मजवरी । पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥ कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥ जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ