भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथांचा नाथ तुझी ब्रीदावली । मज कांरे जाळी भावव्यथा

anathancha nath tujhi bridavali | maj kanre jali bhavavyatha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनाथांचा नाथ तुझी ब्रीदावली । मज कांरे जाळी भावव्यथा ॥१॥ देव म्हणे नाम्या गुरुवांचुनियां । मुक्ति पावावया आन नाहीं ॥२॥ आना नेणें कांहीं करिसी वित्पत्ती । नव्हे माझी प्राप्ती गुरुविण ॥३॥ जाई नाम्या जाई गुरूसी शरण । तुटे भवबंधन तुझें वेगीं ॥४॥ नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊं । कोणा मी होऊं शरणागत ॥५॥