भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा

anathacha nath dinacha dayal | mhanavoni sambhal karin majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥ तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥ बापा जनार्दनीं कृपा करीं दान । सांभाळीं वचन आपुलें तें ॥३॥ एका जनार्दनीं भेटी देई देवा । संतपायीं भावा मिठी पडी ॥४॥