भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें

ananya avari udak nirmal | vasana sojval namrapanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥ प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥ घेऊनियां तीर्थ इंद्रियें तो धांलीं । सकळ निवालीं जनार्दनीं ॥३॥