भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त

ananyasi thav ek sarvakajen | ekavin dujen nene chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥ लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥ तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढएासाटीं ॥३॥