भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाची कोण पाववील हांक । तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे

anathachi kon pavavil hank | tumhi to nairak bramhandache

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अनाथाची कोण पाववील हांक । तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥ मी एक दुर्बळ येतों काकुलती । नेणाची श्रीपती काय करुं ॥२॥ कोण तुम्हांपासी जाणवील मात । होऊनि कृपावंत मजवरी ॥३॥ तुम्हांसी तो धंदा बहुत बहुतांचा । तयामाजिं कैसा आठव माझा ॥४॥ जेथें थोर थोर संत मुनीश्वर । सनकादिक सुरवर भीड त्यांची ॥५॥ निळा म्हणे व्यर्थ गेलों वांयांविण । केला उरला शिण जन्मवरी ॥६॥