भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करुनी सांठवण । ते धरिले हृदयी

anathan jivan | amhan tumache charan | karuni santhavan | te dharile hrudayi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करुनी सांठवण । ते धरिले हृदयी ॥१॥ पुष्ट झाली अंगकांती ।आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥ करुणाउत्तरीं ।करूं आळवण हरी ।जाऊं नेंदू दुरी । प्रेमप्रीतीपडीभरें ॥२॥ मोहममता करी गोवा ।एसें आहेजी केशवा । तुका म्हणे सेवा । आणिक नाही जाणत ॥३॥