भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी

anadi nirmal vedanchen jen mul | parabramha sojval vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥ कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥ आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥