कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती
karkashasangati | duhkh udand phajiti
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
karkashasangati | duhkh udand phajiti
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
karma dharma navhati sang | unya angen patan
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥ भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥
kalidharma magen sangitale santin | achar sanditi dvijalok
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
kaliyugin kavitva kariti pashand | kushal he bhand bahu jale
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥
kalpataru ruya navhati babhula | puraviti phala iichchhatiya
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥१॥ उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
kalpataruangin iichchhalen ten phal | abhagi durbal bhavi siddhi
कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥
kalpatarukhalin | phalen yeti magitalin
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥ तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
kalyan ya ashirvaden | jati dvandven nasoni
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥
kalal he khun | tari davi narayan
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥ सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥
kalalen majha tuj navhe re athav | kay kaj jiv thevun atan
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥ तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झालें जिणें ॥ध्रु.॥
kalas vahiyela shirin | sahasranamen puja karin
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥
kale na kale tya dharma | aika sangaton re varma | majhya vithobachen nam | atahasen uchchara
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥ तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥
kalel hen taisen gain mi tuj | janasaven kaj kay majhen
कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥
kalon ala bhav majha maj deva | vanyanvin jiva atakeli
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आटकेली ॥१॥ जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे शेवटीं हातीं कांहीं ॥ध्रु.॥
kalon alen aisen atan | nahin satta tumhansi
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥१॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥
kalon alen tujhen jinen | deva tun majhen posanen
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसणें ॥१॥ वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥ध्रु.॥
kalon naye ton chi chukavitan baren | mag pathamoren kay kaj
कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥१॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ध्रु.॥
kalon yeten tari kan navhe | padati goven bhramache
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥ जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥
kalon yeten varma | tari na pavaton shram
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥ तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संसार ॥ध्रु.॥
kavanachen karan na lagechi kanhin |sarvi sarvanthayin tun maj ek | kayavachaman thevilen tujhya payin | ata uralen kai na dise deva
कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक । कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥ कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥