भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी

kalon alen aisen atan | nahin satta tumhansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥१॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥ आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥२॥ तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥