भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले

kaliyugin kavitva kariti pashand | kushal he bhand bahu jale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥ डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥ वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥