भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक । कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा

kavanachen karan na lagechi kanhin |sarvi sarvanthayin tun maj ek | kayavachaman thevilen tujhya payin | ata uralen kai na dise deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक । कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥ कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥ जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें । पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पीली ॥२॥ पितरस्वरूपी तूं चि जनार्दन। सव्य तें कवण अपसव्य । तुका म्हणे जीत पिंड तुझे हातीं । देऊनि निंश्चिती मानियेली ॥३॥