भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन

karma dharma navhati sang | unya angen patan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥ भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥ प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥ तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥