भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे

kalon yeten tari kan navhe | padati goven bhramache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥ जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥ आंविसासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥ तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठे बळीवंत ॥३॥