भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥ निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥ ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-नियां ॥१॥ तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवकी कवण वसुदेव कवण । सांगवी हे खूण नाग-वळा ॥१॥ ऐकोनी उत्तर देव मनीं पाही । बोलतो लवलाही चित्त देईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की ॥१॥ पाहोनी तुज झालें समाधान । सुखी आहे कृष्ण मथुरेंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचें ह्लदय जळतसे ॥१॥ हरणें पळती देखोनियां । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवराज आले मंचकीं बैसले । भक्तांसि दिधलें अभय-दान ॥१॥ दासहो तुह्मी सकळ सुखी रहा । सुखी राहोनियां आनंद करा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥ सेवेसी चुकतां होय तूं किरात । ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी ॥१॥ ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥१॥ नसतां पतित कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी । आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तूं जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निकें म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥ तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचें हरीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तूं प्रथम गर्भबास भोगिसी । सागरीं जळचरु मत्स्य झालासी । कमठ पाठी नसंडी कैसी । कूर्में कासाविसी केलें तुज ॥१॥ अपवित्र नाम आदि वराह । याहूनि थोर कुर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥ धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव