भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी

deva tun pratham karma bhogisi | sagarin jalacharun machh jalasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥ अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥ खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें । पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा । भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥ ऐसा कष्टी होउनि बोध्य राहिलासी । तूं कलंकी या लोका भारिसी । आपल्या दोषासाठीं आणिका दंडिसी । निष्कलंक होसी नारायणा ॥५॥ ऐसा तूं बहुतां दोषीं बांधलासी । पुढीलाचीं जन्में अवगतोसी । विष्णुदास नामा म्हणे ह्रषिकेशी । तुझी भीड कायसी स्वामियाहो ॥६॥