भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें

devalokin indra shevesi sadar | bhutasen chakar hota tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥ सेवेसी चुकतां होय तूं किरात । ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥ शेज सज्ज करितां अंतर पाडिलें । ह्मणोनी घडले भोग त्यासी ॥३॥ नामा ह्मणे सेवा करणें हें कठीण । त्यानें व्हावें जाण सावधान ॥४॥