भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवसमागमें परतले भार । केला हरिगजर समाधीसी

devasamagamen paratale bhar | kela harigajar samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवसमागमें परतले भार । केला हरिगजर समाधीसी ॥१॥ नव दिवस संत समाधीजवळी । देव चंद्रमौळी कीर्तनासी ॥२॥ शुद्धमार्गेसर दशमी भोजनें । विधि नारायणें संपादिली ॥३॥ एकादशीं कीर्तन द्वादशीं पारणीं । मग ऋषि मुनि संतोषले ॥४॥ त्रयोदशीं देव रिघाले बाहेरी । धन्य आळंकापुरीं ज्ञानराज ॥५॥ नामा म्हणे धन्य पलाटण पाउलीं । पंचक्रोश ठेलीं सकळ तीर्थें ॥६॥